अलिबाग दि.११: रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेला एक उज्ज्वल परंपरा आहे. ही परंपरा आजही या संघटनने कायम ठेवली आहे. याचे उदाहरण आजचा जिल्हा मेळावा आहे, असे कौतुगोद्गार रा.जि.प. कर्मचारी संघटना रायगड जिल्हा शाखाचे माजी अध्यक्ष सखाराम (अण्णा) पवार यांनी काढले.
रा.जि.प. कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना रायगडचा पहिला जिल्हा मेळावा बुधवार, दि. ८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वा. क्षात्रैक्य समाज हॉल, कुरुळ येथे रा.जि.प. कर्मचारी संघटना रायगड जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष सखाराम (अण्णा) पवार यांच्या अध्यक्षतेखाली व क्षात्रैक्य समाज अलिबागचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता. याप्रसंगी रा.जि.प.चे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेले, लेखाधिकारी सतीश भोळवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष जी. एच. पाटील, उपाध्यक्ष अजित जाधव, डी.जी. मानकर, सचिव सुरेश म्हात्रे, खजिनदार किशोर घरत, सदानंद शिर्के, राजिप कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. कैलास चौलकर, राजिप कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश नागू म्हात्रे, डॉ. राजू म्हात्रे, न.मो. घरत, आय.के. दळवी, ए.बी. पाटील, मदन मोरे, नामदेव शिंदे, प्रकाश म्हात्रे, डॉ. रवींद्र पाटील, सुचिता पाटील, सुनील पाटील, सदानंद शेळके, नाट्यचित्रपट अभिनेते शरद कोरडे, कोकणनामाचे संपादक उमाजी केळुसकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सखाराम पवार अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. त्यांनी यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
रा.जि.प.चे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेले यांनी बोलताना सांगितले की सेवानिवृत्तांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. महिन्याच्या एक तारखेस निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सॉफ्टवेअर विकसीत करण्यात आले असून ते लवकर सुरु होईल. लेखाधिकारी सतीश भोळवे यांनी सेवानिवृत्तांच्या ज्या समस्या आहेत, त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष देत आलो आहोत आणि देत राहू असे सांगितले. क्षात्रैक्य समाज अलिबागचे अध्यक्ष द्वारकानाथ वामन नाईक यांनी म्हटले की प्रभाकर पाटील अध्यक्ष असताना निवृत्तीच्या वेळी पेन्शनची ऑर्डर हातात ठेवली जायची. ही प्रथा नंतर बंद पडली. आता संगणक युगात ही सोय झाली पाहिजे. रायगड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश नागू म्हात्रे यांनी बोलताना पूर्वी राजिपच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारण सभेचे आयोजन केले जायचे, त्या सभेचे आयोजन पुन्हा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी कळकळीने सांगितले. यावेळी सदानंद शळके, बाबुराव देशमुख, शीतल म्हात्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी संघटना अध्यक्ष जी.एच. पाटील यांनी रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची पार्श्वभूमी, तीचे कार्य याबाबत माहिती दिली.
याच मेळाव्यात ८० वर्षे पूर्ण झालेल्या राजिपच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात सखाराम पवार (९२) अलिबाग, द्वारकानाथ नाईक (८०) आक्षी, दत्तात्रय मुकादम (८३) रेवदंडा, सदानंद इकर (८०) ढवर, श्रीकांत पाटील (८०) कुरुळ, दोडाचार्य व्यकंटाचार्य (८०) चेंढरे, नारायण भगत (८३) चौल, रमेश वाकडे (८३) सासवणे, आत्माराम पाटील (८२) पनवेल, हरिश्चंद्र लक्ष्मण पाटील (८०) पनवेल, वामन बने (८१) पनवेल, रामचंद्र डाके (८३) पनवेल, तुळशीदास मोरजकर (८२) रोहा, कृष्णकांत मोरजकर (८३) रोहा, साधा फाटक (८३) अलिबाग, कुसुम पाटील (८२) अलिबाग, शरद गडेकर (८१) रोहा, गोविंद पवार (८०) माळगाव, पांडुरंग राऊळ (८१) आवास, शशिकांत पाटील (८४) अलिबाग, बाबुराव देशमुख (८३) पनवेल, अशोक सावंत (८२), पेण, तुकारम म्हात्रे (८१) पेण, नारायण म्हात्रे (८०) पोयनाड, प्रकाश लोखंडे (८०) अलिबाग, विश्वनाथ पाटील (८२) अलिबाग, रामचंद्र लाड (८०) अलिबाग, शिवाजी खानविलकर ८३ माणगाव, या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
हा मेळावा मान्यवरांच्या दीपप्रज्ज्वलनानंतर सुरु झाला. प्रारंभी राजेंद्र म्हात्रे, ऋग्वेद म्हात्रे यांनी ईशस्तवन आणि महाराष्ट्र गीत सादर केले आणि शेवटी त्यांच्या पसायदानाने मेळाव्याची सांगता झाली. सूत्रसंचालन अमरदीप ठोंबरे यांनी केले. उपस्थितांचे आभार खजिनदार किशोर म्हात्रे यांनी मानले. या मेळाव्यासाठी रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून राजिपचे सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. क्षात्रैक्य समाज हॉल खचाखच भरला होता.