पनवेल दि.१५ (संजय कदम) : पनवेल जवळील शिरढोण येथे एका वेअरहाऊसला अचानकपणे लागलेल्या आगीत कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या.
शिरढोण येथील कापूस साठवून ठेवलेल्या गोदामाला रविवारी रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान आग लागली होती. नवीन पनवेल आणि पनवेल येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणले.
शिरढोण येथे असलेल्या गो ग्रीन कंपनी लिमिटेडच्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठी ठेवण्यात आल्या होत्या. सदर गाठीला अचानकपणे अज्ञात कारणावरून आग लागल्याने या आगीत कोट्यवधी रुपये किमतीचा कापूस जळून खाक झाला आहे. तर या वेअरहाऊसचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक व अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले व त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर आग कोणत्या कारणाने लागली याचा अधिक तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी करीत आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!