पनवेल दि.२५ (संजय कदम): CEIR पोर्टलचा वापर करून 16 लाख 37 हजार रुपये किंमतीचे 100 मिसिंग मोबाईल तळोजा पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत.
वरिष्ठांनी CEIR पोर्टलचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील तळोजा पोलीस ठाणे हद्दीतील मिसिंग मोबाईल शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तळोजा पोलीस ठाण्यात 01/06/2025 ते 24/03/2026 दरम्यान विशेष मोहीम राबवून 16,37,000 रुपये किमतीचे 100 मिसिंग मोबाईल हस्तगत केले असून तक्रारदार यांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले आहेत. सदरची कामगीरी तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा धुळगंडे, पोलीस शिपाई सचिन माने, पोहवा शंकर शिंदे, पोहवा अजय मढवी, पोहवा दिपक सावंत, पोहवा गुरुनाथ भुंडेरे, पोशी/ राजेश उगाडे गुन्हे प्रकटिकरण अंमलदार यांनी केली आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!