पनवेल दि.३०: मध्य रेल्वेच्या मंडळ कार्यालयाकडून पनवेल रेल्वे स्थानकाच्या सल्लागार समितीवर पनवेलमधील व्यावसायिक सुनिल खळदे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीचे पत्र सुनिल खळदे यांना नुकतेच मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथील मंडळ कार्यालयातील वरिष्ठ व्यवस्थापक जितेंद्र यादव यांच्याकडून देण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील पनवेल रेल्वे स्थानकाच्या सल्लागार समितीवर सुनिल खळदे यांची ही निवड 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या एक वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. पनवेल रेल्वे स्टेशनमधील प्रवाशांना भेडसावणार्‍या समस्या जाणून घेणे व त्यावर उपाययोजना करणे, सार्वजनिक हिताचा व सार्वजनिक सोयीचा कोणताही विषय, प्रवाशांना सेवा सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध बाबतीत ही रेल्वेची कमिटी कार्य करीत असते. अशा या महत्वपूर्ण कमिटीवर सामाजिक कार्यकर्ते सुनिल खळदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सुनिल खळदे हे पनवेल शहर भाजपाचे माजी सचिव तसेच श्री गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव टपालनाका पनवेलचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा पनवेल तालुक्याचे अध्यक्ष, पनवेल शहरातील रणछोड देवस्थान ट्रस्टचे (शनि मंदिर) विश्वस्त आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!