पनवेल दि.३१ (संजय कदम) लायन्स क्लब पनवेल तर्फे ५४ वे नेत्र चिकित्सा शिबिर शनिवार दि.०६ जानेवारी २०२४ पासून ते सोमवार दि.०८ जानेवारी २०२४ पर्यंत व्ही. के. हाय स्कूल पनवेल येथे सकाळी १० ते दुपारी ०३ या वेळेत मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदु शस्त्रक्रिया सुसज्ज हॉस्पिटल मध्ये करण्यात येणार आहेत.
पनवेल क्लबने मागील सतत ५३ वर्षात १६ हजारच्यावर मोतीबिंदुची शस्त्रक्रिया व १ लाखाच्यावर चष्मे वाटप करण्यात आले आहेत. अशाप्रकारे गरिब आणि गरजुंना त्यांची दृष्टी टिकण्यासाठी मदत झाली आहे. यंदाच्या वर्षी पनवेल लायन्स क्लबचे ५४ वे नेत्र शिबिर आयोजित केले आहे. सदर “नेत्र चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर” शनिवार दि.०६ जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहे. व्ही. के. हायस्कुल, पनवेल येथे नेत्र तपासणी होईल व रुग्णांची निवासी व्यवस्था तेथेच करण्यात आली आहे. त्याच दिवसापासुन सुसज्य हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक पध्दतीने तज्ञ डॉक्टरांमार्फत योग्य रुग्णांवर शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात येणार आहे. रुग्णांची डोळे तपासणी करुन गरजुंना अल्पदरामध्ये चष्मे देण्यात येतील. शस्त्रक्रिया करण्यालायक रुग्णांची राहण्याची, जेवणाची, औषधांची व इतर सर्व व्यवस्था पनवेल लायन्स क्लब तर्फेच करण्यात येणार आहे. रुग्णांनी कपडयां व्यतिरिक्त इतर कोणतेही सामान बरोबर आणू नये. येताना रुग्णांनी रेशनकार्ड व आधार कार्ड व त्यांची झेरॉक्सची प्रत सोबत आणावे. पनवेल लायन्स क्लबने १ जुलै २०२३ पासुन ४३ मोतीबिंदु रुग्णांवर शस्त्रक्रिया केलीली आहे. नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये विविध ग्रामिण व आदिवासी कातकरी भागातील नेत्र शिबिर आयोजित केले होते. त्यामध्ये अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. नेत्र शिबिरात जवळ जवळ १६० मोतीबिंदु आसणारे रुग्ण आढळून आले आहेत त्यांची मोतीबिंदुची शस्त्रक्रिया दि.०६ ते ०८ जानेवारी २०२४ च्या शिबिरात करण्यात येईल. पनवेल लायन्स क्लबचा या वर्षी २५०-३०० मोतीबिंदु या शिबिरामार्फत करण्याचा मानचा मानस आहे. तरी गरजु व्यक्तींनी त्याचा लाभ घ्यावा तसेच आपल्या भागातील गरजु व्यक्तींनी नेत्र शिबिराबाबत कळवावे. नाव व नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी अध्यक्षः एस. जि. चव्हाण ९३७२४१३३४२ सचिव: अशोक गिल्डा ९८१९००९२९२ मो.नं वर संपर्क साधावा.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!