पनवेल दि.१६: पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते डॅशिंग युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक १८ मे रोजी कामोठे येथे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मा. श्री. परेश ठाकूर केसरी पनवेल २०२४’ या भव्य कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित करण्यात आले आहेत. शनिवारी सायंकाळी ०४ वाजता सेक्टर ११ मधील नालंदा बुद्धविहाराच्या बाजूला असलेल्या मैदानावर हे जंगी सामने होणार आहेत.
यावेळी विशेष आकर्षण म्हणून नेपाळ येथील पै. देवा थापा आणि हिमाचल प्रदेश येथील पै. नविन चौहान यांची बिग शो मॅच होणार आहे. तसेच सामने महिला आणि पुरुष या प्रकारात आणि विविध गटात होणार असून विजेत्यांना एकूण ०५ लाख रुपयांच्या रोख रक्कमेचे पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. कुस्ती हा खेळ आपल्या भारतात प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्राचीन काळी जत्रा, मेळावे यांचे आयोजन असताना गावोगावी कुस्त्या भरवल्या जात असत. मैदानी आणि मर्दानी असलेल्या या मातीतल्या खेळाला जागतिक स्तरावरही मानसन्मान आहे आणि आपली कुस्ती ऑलिम्पिकमध्येही खेळली जात आहे. त्यामुळे कुस्तीचे आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याप्रमाणे हे कुस्ती सामने भव्य होण्यासाठी कामोठेतील मैदान आकर्षकपणे सजत आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!