पनवेल, दि.16 (संजय कदम) : पनवेल शहर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजाविणार्‍या महिला पोलीस अंमलदार शितल रवींद्र कोकणी यांचे लग्न लोकसभा निवडणुुकीच्या 3 दिवसापूर्वी झाले असताना हाताची मेहंदी सुकत नाही तोच कर्तव्याप्रति प्रामाणिकपणा दाखवून त्या त्वरित आपल्या कर्तव्यावर रुजू झाल्या या त्यांच्या कर्तव्यदक्ष प्रेमाबद्दल पोलीस खात्यासह निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे नेमणुकीतील महिला पोलीस अंमलदार शितल रवींद्र कोकणी या मागील 02 वर्षापासून पोलीस ठाण्यास नेमणुकीस आहेत पोलीस ठाणे ते नेमणुकी दरम्यान प्रामाणिकपणे कर्तव्य बनवणार्‍या शितल कोकणी यांनी लोकसभा निवडणूक दरम्यान आपल्या प्रामाणिकपणाची पुन्हा एकदा अनोखी झलक दाखवली. मावळ मतदारसंघात दिनांक 13/05/2024 रोजी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडली असून त्यापूर्वी 03 दिवसांपूर्वी दिनांक 10/05/2024 रोजी शितल कोकणी यांचा नंदुरबार येथे विवाह सोहळा संपन्न झाला. भावी वैवाहिक आयुष्याच्या सुखाची नुकतीच सुरुवात झाली असतानाही समाजसेवा आणि कर्तव्य डोळ्यासमोर ठेवून शितल कोकणी यांनी लग्नानंतर दुसर्‍या दिवशी नंदुरबार ते पनवेल असा प्रवास करून पुन्हा कर्तव्यावर हजर होऊन लोकसभा निवडणूक बंदोबस्तात कर्तव्य बजावले. याकरिता 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके, परिमंडळ-2 पनवेलचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, पनवेल विभागाचे सहा पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी शितल कोकणी यांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या कर्तव्यप्रति प्रेमाची प्रशंसा केली. लोकसभा निवडणूक बंदोबस्त शांततेत पार पडला असून महिला पोलीस शिपाई शितल कोकणी यांचे कर्तव्य दक्षतेबाबत पोलीस दल तसेच समाजातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!