पनवेल, दि.17 (संजय कदम) : पनवेल जवळील जेएनपीटी ते पळस्पे रोडवर महात्मा फुले कॉलेज समोरील रस्त्यावर उभ्या स्वीफ्ट डिझायर गाडीस पाठीमागून येणार्‍या ट्रेलरने ठोकर मारुन झालेल्या घटनेत दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सदर ठिकाणी नादुरुस्त स्वीफ्ट डिझायर गाडी क्र.एमएच-14-जेएल-9880 ही उभी असताना पाठीमागून येणार्‍या ट्रेलर क्रं.एमएच-43-सीई-8620 या वाहनावरील चालकाने हयगयीने व बेदरकारपणे वाहन चालवून स्वीफ्ट डिझायर गाडीला पाठीमागून ठोकर मारुन वाहन उलटल्याने ट्रेलर चालक काकासाहेब बोटे व स्वीफ्ट गाडीचा चालक रवींद्र मालवणकर हे दोघे जखमी झाले असून या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक तसेच वाहतूक शाखेचे पथक व पनवेल अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना होवून त्यांनी गाडी खाली अडकलेल्या चालकांना अथक परिश्रम करून बाहेर काढले आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!