रत्नागिरी दि.३० (सुनील नलावडे) रत्नागिरी नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष पोट निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखत आपला गड कायम राखला असला तरी या निवडणुकीत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. संघर्षमय झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे प्रदीप उर्फ बंड्या साळवी १०९२ मतांनी विजयी झाले. भाजपने प्रतिष्टेच्या केलेल्या लढतीत शिवसेनेने बाजी मारली आहे सेना आणि भाजप मध्ये चुरशीची लढत झाली असली तरी काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद कीर यांनी भाजपा समांतर खालोखाल मते मिळवल्याने शिवसेनेचा विजय सुकर झाला एका परीने सेनेला आपले अस्तित्व दाखवता आले त्यामुळे भाजपचे उमेदवार दीपक पटवर्धन यांना चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत शिवसेनेकडून आजच मंत्री झालेले उदय सामंत यांनी प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली होती. खासदार विनायक राऊत व आ.राजन साळवी यांनीहि या मतदार संघात प्रचाराची सूत्रे हलवली होती. रत्नागिरी पालिकेत शिवसेनेचे एकहाती बहुमत असून २४ विद्यमान नगरसेवसक व जिल्हा परिषद ताब्यात असताना भाजपने यावेळी प्रथमच जोरदार संघर्ष देत शिवसेनेचा वारू अखेरच्या मतमोजणी फेरी मध्ये रोखण्याचा प्रयत्न केला मात्र शिवसेनेचा १०९२ मतांनी विजय झाला. या निवडणुकीत भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,खासदार नारायण राणे,माजी खासदार निलेश राणे, आ.संजय केळकर, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, चित्रा वाघ अशी दिग्गज मंडळी उतरवली होती आ.प्रसाद लाड या मतदारसंघात ८दिवस तळ ठोकून होते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शहरात पायी प्रचार फेरी काढून तसेच शहरातील सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या दारी जाऊन प्रचाराची आगळी पद्धत अवलंबली होती मात्र एवढी मोर्चे बांधणी करूनही भाजपला या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला व पुन्हा एकदा उदय सामंत यांनी आपली चतुराई सिद्धकरत जेमतेम गड राखला एवढेच म्हणावे लागेल.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!