पनवेल दि.९: पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कौतुक केले आहे.
गजानन घाडगे यांनी शंभर दिवसांची क्षेत्रीय कार्यालय सुधारणा मोहीम अंतर्गत द्वितीय क्रमांकाचे गुणांकन प्राप्त करत प्रशासकीय कामगिरी केली आहे. भविष्यात त्यांची कामगिरी अशीच उज्वल राहील असा दृढ विश्वास असल्याचे प्रशस्तीपत्रक आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गजानन घाडगे यांना दिले आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून गजानन घाडगे ओळखले जातात. पोलीस दलात त्यांच्या नावाचा एक दबदबा आहे. डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून गुन्हेगारांवर त्यांचा वचक कायम राहिला आहे. यापुर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तसेच सोलापूर येथे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.

🛑कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६६ वी पुण्यतिथी; ♦️रयत शिक्षण संस्थेला सदैव मोलाची साथ देणाऱ्या देणगीदारांचा केला गेला सन्मान

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!