उरण दि.१७ (विठ्ठल ममताबादे) महाराष्ट्र प्रीमिअर लीग ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी टी 20 स्पर्धा १५ जून पासून सुरू होत असून. या स्पर्धेत प्रसिद्ध हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांचा मुलगा सिद्धार्थ याची महाराष्ट्र प्रीमिअर लीग कोल्हापूर टस्कर्स टीम मध्ये निवड झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ही या स्तरावरची पहिलीच मोठी स्पर्धा आहे. पुणेरी बाप्पा पुणे, रत्नागिरी जेटस रत्नागिरी, सोलापूर रॉयल्स सोलापूर, छत्रपती संभाजी किंग्ज संभाजीनगर, एगल टायटन्स नाशिक आणि कोल्हापूर टस्कर्स अशा महाराष्ट्रातील मोठ्या संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. उरणचा सिद्धार्थ म्हात्रे हा केदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या टीम मध्ये खेळणार आहे. आणि त्याचे मागील सामन्यातील सर्वोत्तम खेळ पहाता सिद्धार्थ नक्कीच या लीग मध्ये नक्कीच सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास वाटतो. केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे, राहुल त्रिपाठी असे अनेक आयपीएल मधील खेळाडू सुद्धा या स्पर्धेत आहेत. या स्पर्धेत अनेक खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळणार आहे. पावसाचं सावट जरूर या स्पर्धेवर आहे. सिध्दार्थला, त्याच्या कोल्हापूर टस्कर्स टीमला आणि महाराष्ट्र प्रीमिअर लीगला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!