अलिबाग दि.१७:- २१ जून या “जागतिक योग दिनाच्या” निमित्ताने भारताबरोबरच अनेक देशांमध्ये ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. समग्र स्वास्थ्य मिळविण्याच्या हेतूने वसुधैव कुटुंबकम या पार्श्वभूमीवर आधारित “One World One Health हा या वर्षीचा विषय आहे. स्वतः बरोबर पूर्ण जगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य योग च्या माध्यमातून संतुलित करणे हा वैश्विक उद्देश या मागे आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठी भारत सरकार खेडेगावातील अंगणवाडी, ग्रामपंचायत, शाळा, सरकारी कार्यालयांपासून, बहुराष्ट्रीय कंपन्यापर्यंत जागतिक योग दिवस साजरा करीत आहेत.
मागील काही वर्षांमध्ये झालेल्या योग प्रचाराचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की, योग प्रशिक्षणाची मागणी सर्वत्र वाढत आहे, योग कडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टीकोन वाढीस चालला आहे. सर्व जगाला जोडण्याची ताकद योग शास्त्रामध्ये आहे, आपण सर्वांनी भारतीय परंपरेने आपल्याला प्राप्त झालेल्या शास्त्राचा आदर करून योग जीवन शैली आपल्या आयुष्यात प्रत्यक्षपणे आणण्याचा प्रयत्न करू या. उर्जा आणि सकारत्मकता प्राप्त करून देणारे योग शास्त्र काही वर्षांनी जगाच्या इतिहासामध्ये ‘जागतिक शांतीदूत’ म्हणून नक्कीच संबोधले जाईल.

जागतिक योग दिनानिमित्त बुधवार दिनांक २१ जून रोजी सकाळी ६ वाजता भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्याची संधी मिळणार आहे.
यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत युवा व ज्येष्ठ योगासने करणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे (९७७३९४७७७७) किंवा शहराध्यक्ष रोहित जगताप (८६९१९३०७०९) यांच्याशी संपर्क साधावा.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!