पनवेल दि.१०: जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाची निवडणूक आज झाली असून यामध्येही भाजपच नंबर वन असल्याचे सिद्ध झाले.
मागील महिन्यात विविध ग्रामपंचतीच्या सार्वत्रिक निवडणुकी पार पडल्या. या निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करीत नंबर वन कामगिरी केली.  विशेषतत्त्वाने अनेक वर्षांपासून शेकापक्षाच्या ताब्यातील ग्रामपंचायत भाजपच्या शिलेदारांनी काबीज करत या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली.
पालीदेवद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी योगिता राजेश पाटील, उपसरपंचपदी अशोक पाटील निवडून आले आहेत. या ग्रामपंचायतीत १२ सदस्य भाजपचे असताना १३ मते त्यांना पडली. त्यामुळे शेकापचा एक मत फुटून तो भाजपला मिळाला. वाजे, खैरवाडी, केवाळे, उमरोली, आकुर्ली, सावळे, वारदोली ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक बिनविरोध झाली. वाजे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंजली राजेंद्र भालेकर, उपसरपंचपदी रेवण आत्माराम पाटील, खानाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयश्री शशिकांत दिसले, उपसरपंचपदी बाळाराम कोंडू पाटील, आकुर्ली सरपंचपदी भारती सचिन पाटील, उपसरपंचपदी सत्यवान लक्ष्मण धरणेकर, उमरोली सरपंचपदी कमला बळीराम मढवी, उपसरपंचपदी रोशन शांताराम पोपेटा, वारदोली सरपंचपदी संगिता बाळू भूतांबरा, उपसरपंचपदी सविता संतोष पाटील, केवाळे  सरपंचपदी रेणुका अशोक गायकर, उपसरपंचपदी कांचन परशुराम पालकर, वाकडी सरपंचपदी कुंदा बाळू पवार, उपसरपंचपदी अरुण नरेश पाटील, खैरवाडी सरपंचपदी रजनी गोमा ढुमणे, उपसरपंचपदी हनुमान खैर, सावळे सरपंचपदी प्रशांत नरेश माळी, उपसरपंचपदी कांता वसंत कांबळे, देवळोली सरपंचपदी काजल मंगेश पाटील, पोसरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भावना विशाल जोशी तर उपसरपंचपदी सतिश पाटील विराजमान झाले आहेत.
या सर्व शिलेदारांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!