पनवेल दि.३०: बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील नादब्रम्ह साधना मंडळाचे संस्थापक तथा विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा गुरुवार दिनांक ५ डिसेंबर रोजी दुपारी ३. ३० वाजता ठाणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणेशपुरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
नवी, मुंबई, रायगड, ठाणे, मुंबई तसेच राज्यातील परिसरात ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांनी शास्त्रीय संगीत व भजन संगीतच्या प्रचार व प्रसारासाठी अपार मेहनत घेतली आहे. ६० वर्षेहून अधिक काळ त्यांनी या क्षेत्राची सेवा केली आहे. त्यांनी या क्षेत्रातून अनेक हजारो शिष्य घडविले आहेत. त्यांच्या या शिकवणीतून तयार झालेल्या कलाकारांनी आपले नाव उंचावले आहे. ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचे संगीत क्षेत्रातील कार्य समाजाला नेहमी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरले आहे. त्या अनुषंगाने त्यांचा ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने होणार आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!