पनवेल, दि.23 : पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे वॉटर कुलर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या वतीने देण्यात आला आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे येथे येणार्या तक्रारदार व अर्जदार अभ्यंगासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून वॉटर कुलर कोणत्या सामाजिक संस्थेकडून मिळेल का अशी विनंती पोलीस ठाण्याकडुन पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य व रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्याकडे केली होती. याचा त्वरित पाठपुरावा करून जवळपास 50 हजार रुपये किमतीचा वॉटर कुलर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या मार्फत मंजूर करून घेऊन तो पनवेल शहर पोलीस ठाणाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसविण्यात आला आहे. सदर वॉटर कुलरचे उद्घाटन रोटरी 3131 चे जिल्हा गव्हर्नर शीतल शाह, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे, पो.नि.शाकीर पटेल, जिल्हा प्रथम महिला रागिणी शाह, सहाय्यक गव्हर्नर डॉ. किरण कल्याणकर, पीडीजी डॉ. गिरीश गुणे, अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दीपक गडगे, डॉ.आवटे, रोटेरियन आणि अनस, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल सदस्य तसेच पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे, रायगड प्रेस क्लब जिल्हा सल्लागार संजय कदम, सचिव दत्तात्रेय कुलकर्णी, खजिनदार राकेश पितळे, सल्लागार विजय पवार, प्रतिक वेदपाठक आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.