पनवेल,दि.18 : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या डी.पीआर. क्रमांक 3 व 4 नुसार झोपडपट्ट्यांचा पुर्नविकास करण्याच्या महत्वाच्या विषयास आज महासभेने मंजूरी दिली.
महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे ऑनलाईन पध्दतीने महासभा घेण्यात आली. यावेळी आयुक्त उपमहापौर सीताताई पाटील, गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव तिलकराज खापर्डे पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्ट्यांचा पुर्नविकास करण्यासाठी मनपा मालकीचे भूखंड वाल्मिकी नगर, महाकाली नगर, हॉस्टेल प्लॅट, टपाल नाका व राज्यशासनाच्या मालकीचा कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला येथील जमिनीवर आयएसएसआर व एएचपी या घटका अंतर्गत राज्य् व केंद्र शासनाने एकुण चार डीपीआरला मंजूरी प्राप्त झाली आहे. आज दुसऱ्या टप्यात सविस्तर प्रकल्प अहवाल 3 व 4 मधील प्रकल्पाच्या कामाला सरुवात करण्याच्या प्रस्तावाला महासभेने मंजूरी दिली. यामध्ये कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्याल्चा समावेश असून याठिकाणच्या 937 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये एकुण 1598 घरे असून 96 दुकाने असणार आहेत.यास एकुण खर्च 322.54 कोटी एवढा खर्च होणार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!