पनवेल दि. १९: १९ फेब्रुवारी दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार साजरी केली जाते.
महाराष्ट्र सरकारने २००१ मध्ये फाल्गुन वद्य तृतीया, १५५१ (शुक्रवार.१९ फेब्रुवारी १६३०) ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख म्हणून स्वीकरली आहे. सरकार कडून या दिवशी शिवजन्मोत्सव साजरा केला जातो आणि त्याची सरकारी सुट्टी देखील दिली जाते.
रायगड किल्ल्यावर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करून किल्ल्यावरील राजसदर, महाराजांची समाधी, जिजामाता समाधी येथेही आदरांजली वाहिली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पनवेल शहरातील महाराजांच्या पुर्णाकृती पुतळा व अर्धाकृती पुतळ्याला, महापौर डॉ कविता चौतमोल, आमदार प्रशांत ठाकूर ,आयुक्त गणेश देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने सुमेध भालेराव या शालेय विद्यार्थ्याचे भाषण झाले. शहरातील तरुण मंडळांनी विविध ठिकांणांहून शिवज्योत आणून महाराजांना अभिवादन केले. महापालिकेच्यावतीने महाराजांच्या पुर्णाकृती पुतळा व अर्धाकृती पुतळा परिसराला फुलांची सजावट करण्यात आली होती.