रत्नागिरी दि.१८: राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळला असून काही भागांमध्ये गारपीटीही झाली. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित सुद्धा झाला.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचे वृत्त आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
मुंबई उपनगरांमधील नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबवलीसहीत अंबरनाथमध्येही मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे अंब्याच्या पिकाबरोबरच अनेक जिल्ह्यांमधील शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाचे पहाटे पासुन रात्री पर्यांत पावसाचे थैमान विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असून आज सायंकाळी पावणे सहा वाजता चिपळून कापसाळ भागात व काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. चिपळूणात दुपारपासुन जोराचा पाऊस विजांसह सुरु झाला होता तर संगमेश्वर साखारपा देवरुख माखजन पट्यात पहाटे पावणे दोन पासुन सुरुवात झाली रत्नागिरी शहर परीसरात रात्री साडेसात पासुन विजेसह पाऊस पडण्यास सुरुवात झाली असुन शहर उपनगर भागात विज सुद्धा गायब झाली तसेच अवकाळी पावसाचा धसका आंबा बागायात दारांनी घेतला असुन त्यांची चिंता वाढली आहे.
अनेक भागांमध्ये पावसाबरोबरच जोराची हवा सुरू असल्याने हवेत गारवाही निर्माण झाला आहे. दरम्यान, अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची त्रोधातिरपीट उडाली.
