अलिबाग,दि.1: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 641 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 28 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-16, पनवेल (ग्रा)-5, उरण-3, रोहा-2, म्हसळा-1, महाड-1 अशा प्रकारे एकूण 28 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात एकाही व्यक्तीची मृत व्यक्ती म्हणून नोंद झालेली नाही.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-193, पनवेल ग्रामीण-65, उरण-25, खालापूर-7, कर्जत-17, पेण-9, अलिबाग-29, मुरुड-13, माणगाव-30 तळा-7, रोहा-21, सुधागड-1, श्रीवर्धन-4, म्हसळा-17, महाड-3, पोलादपूर-12 अशी एकूण 454 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-327, पनवेल ग्रामीण 134, उरण-134 खालापूर-2, कर्जत-9, पेण-4, अलिबाग-7, माणगाव-12, तळा-4, श्रीवर्धन-5, महाड-2, पोलादपूर-1 अशी एकूण 641 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-12, पनवेल ग्रामीण-3, उरण-1, कर्जत-5, माणगाव-4 असे एकूण 25 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-22, पनवेल ग्रामीण-9, उरण-1, खालापूर-1, कर्जत-2, अलिबाग-3, मुरुड-2, श्रीवर्धन-2, म्हसळा-3, महाड-4, पोलादपूर-1 असे एकूण 50 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 3 हजार 920 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अंती त्यापैकी 2 हजार 626 नागरिकांचे रिपोर्ट ‘-’ ve प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 149 आहे.