मुंबई दि.०१: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मान्सून पूर्व पावसाचे आगमन होत आहे. फक्त मुंबईच नाही तर, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार असून, काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई म्हणजेच कुलाबा वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. यानुसार 1 जून ते 5 जून या काळात महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या 2 -3 दिवसात पश्चिम किनार पट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली होती. यासाठी नागरिकांसह यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
कुलाबा वेधशाळेच्या अनुमानानुसार,
रेड अलर्ट –
3 जून – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार व नाशिक
4 जून – नंदुरबार, धुळे व पालघर
या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट –
1 जून – रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
4 जून – नाशिक, रायगड, मुंबई व ठाणे
