अलिबाग दि.५: कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत तसेच रायगड जिल्हा प्रभारी चारुलता टोकस, सह्प्रभारी श्रीमती राणी अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात पेण, पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर, म्हसळा, माणगांव येथे केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात निषेध करण्यात आला. केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतांना जीवनावश्यक वस्तूंवरील GST लावून सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पाहात आहे. बेरोजगारीने कहर केला असून तरुणांचे भविष्य अंधारात आहे. महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत या सर्व गोष्टींना आमजनता त्रासली आहे. त्यामुळेच कॉंग्रेस पक्षाने पुकारलेल्या या निषेध आंदोलनात सामान्य जनता उस्फुर्तपणे सहभागी झालेली दिसून आली.

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस पक्षातर्फेही केंद्र सरकारचा व राज्य सरकारचा जाहीर निषेध करून आंदोलन करण्यात आले या वेळी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष अभिजित पाटील, जेष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, जिल्हा महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, शशिकांत बांदोडकर, नौफील सय्यद, अमीर सय्यद  विश्वनाथ चौधरी, पूजा मोहन, रेमंड गोवियस, आदम ढलाईत, आदित्य सावळेकर, भारती जळगावकर, संतोष चिखलकर, अरुण ठाकूर, अंकुश गायकवाड, अखिल अधिकारी, नित्यानंद म्हात्रे, सुधीर मोरे, अनुपमा चुढा, नीता शेनोय, डॉ. अमित दवे,  आरती ठाकुर, अंजुम तेरवा, इ अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!