माथेरान दि.१६: (मुकुंद रांजणे) सर्वानाच प्रतीक्षा असणारी नेरळ माथेरान दरम्यान धावणारी माथेरानची महाराणी अर्थातच मिनिट्रेन १ नोव्हेंबर पासून रुळावर येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना प्रतीक्षा असणारी ही सेवा लवकरच उपलब्ध होणार असल्याने पर्यटकांसह स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात चार महिने घाटरस्त्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची भीती असते याच कारणास्तव ही सेवा बंद करण्यात येते त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी ही सेवा नेहमीच पूर्वपदावर येते परंतु यावेळी काही तांत्रिक बाबी लक्षात घेऊन १ नोव्हेंबर पासून ही गाडी रुळावर येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सद्यस्थितीत चार महिने घाटातील काही तांत्रिक बाबी तसेच रुळांची दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात येत असून या चार महिन्यात अनेकदा मालवाहू ट्रेन नियमितपणे नेरळ वरून माथेरान स्टेशन पर्यंत ये जा करत होती.
येणारे पर्यटक हे खासकरून या गाडीची सफर करण्यासाठीच येतात. काही वर्षांपासून अमन लॉज ते माथेरान स्टेशन दरम्यान मिनिट्रेनची शटल सेवा उपलब्ध असल्याने पावसाळ्यात सुध्दा पर्यटक मोठया संख्येने हजेरी लावतात. नेरळ ते माथेरान मिनिट्रेनच्या मर्यादित आणि कमी फेऱ्या असल्यामुळे अनेकदा पर्यटकांना तिकिटाचे अभावी या गाडीचा आनंद घेता येत नाही. २१ किलोमीटरचा हा प्रवास करताना डोंगर दर्याना आव्हाने देत येणाऱ्या या गाडीतुन प्रवास करणे म्हणजे पर्यटकांना एक विलक्षण आनंद मिळतो.लहान लहान मुलांना खऱ्या अर्थाने या गाडीची मजा घेता येते. त्यासाठी या मार्गावर फेऱ्या वाढविल्यास पर्यटनात वाढ होऊ शकते असे पर्यटकांसह स्थानिक बोलत आहेत.
रेल्वे प्रशासनाने नव्या धाटणीची इंजिने उपलब्ध केल्यास गाडीच्या फेऱ्यात वाढ होऊन पर्यटन निश्चितपणे बहरेल. त्यासाठी स्थानिकांनी वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

🛑Navi Mumbai Airport Flight Testing
🔸नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान
🔹भारतीय वायुदलाच्या सी 295 विमानाचं यशस्वी लँडिंग

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!