पनवेल दि 2 : कोरोना विषाणू प्रार्दुभाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, सार्वजनिक जागेवर थुंकण्यावर बंदी अशा उपाय योजना नागरिकांनी करणे गरजेचे आहे. पालिकेने नागरिकांना वारंवार या उपाय योजना पाळण्याबाबत सूचना दिल्या आहेत.या सूचनांचे उल्लघंन करणाऱ्यावर खालीलप्रमाणे दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.
सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न वापरणे, यावर 1897च्या साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार 500 रूपये दंड आणि दुसऱ्यांदा आढळल्यास दुप्पट दंड किंवा फौजदारी कारवाई अथवा दोन्ही प्रकारची कार्यवाही करण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी (रस्ते, बाजार,रूग्णालय, कार्यालय) थुंकणे यांवर 1000 रूपये दंड 1897च्या साथरोग प्रतिबंधात्मक कायदानुसार दुसऱ्यांदा आढळल्यास दुप्पट दंड किंवा फौजदारी कारवाई अथवा दोन्ही प्रकारची कार्यवाही करण्यात येणार आहे.
सर्व दुकानदार, फळे-भाजीपाला विक्रेते तसेच सर्व जीवनाश्यक वस्तू विक्रते इत्यादी आणि ग्राहक यांना सामाजिक अंतर न राखणे यासाठी रक्कम 200 रुपये तसेच आस्थापना, मालक, दुकानदार, विक्रेते यांना 2000 रूपये दंड आकारण्यात आला आहे. दुसऱ्यांदा आढळल्यास दुप्पट दंड किंवा फौजदारी कारवाई अथवा दोन्ही प्रकारची कार्यवाही करण्यात येणार आहे.
या कार्यवाहीसाठी पालिकेच्यावतीने बीट मार्शल अर्थात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!