पनवेल दि.०२: के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय हे नवोदित तसेच होतकरू साहित्यिक, कवी, लेखक यांना नेहमीच प्रोत्साहित करीत आहेत, त्या अनुषंगाने या वाचनालयाचा अधिक उत्कर्ष व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 
पनवेलच्या साहित्यिकांच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७० व्या वाढदिवसानिमित्त पनवेलमधील साहित्यिकांची ७० पुस्तके लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते के. गो. लिमये वाचनालयाला भेट देण्यात आली. त्यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर ठाकूर यांनी या वाचनालयाच्या प्रति आपले भावनिक नाते असल्याचे स्पष्ट करत या वाचनालयातून आणखी साहित्यिक, लेखक, कवी निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करीत वाचकांसाठी हे वाचनालय एक आदर्श साहित्य वास्तू असल्याचे नमूद केले. 
या कार्यक्रमास सुप्रसिद्ध गझलकार ए. के. शेख, कोकण मराठी साहित्य परिषद  नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, साहित्यिक प्रा. चंद्रकांत मढवी, ज्योत्स्ना राजपूत, गणेश म्हात्रे, रामदास गायधने, नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य श्याम पुंडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या सहचिटणीस जयश्री शेटये, ग्रंथपाल निकिता शिंदे, पत्रकार रमेश भोळे, सुमंत नलावडे, लक्ष्मण ठाकूर आदी उपस्थित होते. 
यावेळी सुप्रसिद्ध गझलकार ए. के. शेख यांनी म्हंटले कि, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा ७० वा वाढदिवस साजरा होत आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर नेहमीच साहित्यिक, कवी. लेखकांना प्रोत्साहन देत असतात. साहित्यिकांबद्दल त्यांना आस्था असून या नगरीचे ते पालक आहेत. 
कोकण मराठी साहित्य परिषद  नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी आपल्या प्रास्तविकात सांगितले कि, कवी, लेखक, साहित्यिक आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जवळचे नाते आहे. साहित्यिक वारसा पुढे चालत रहावा यासाठी वाचनालयीन पुस्तके भेट देत आहोत असे सांगून हा साहित्यिकांसाठी आगळावेगळा उपक्रम आल्याचा आवर्जून उल्लेख केला. 
यावेळी के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या सहचिटणीस जयश्री शेटये, ग्रंथपाल निकिता शिंदे यांनी वाचनालयाच्यावतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या ०२ लाख रुपयांच्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!