पनवेल दि.30: बदल हा मानवाचा स्थायीभाव आहे. मानवी जीवनात, समाजात सातत्याने बदल होत असतात. त्याचा वेध घेणारा दै. रामप्रहरचा दिवाळी विशेषांक वाचनीय आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल येथे काढले.
दै. रामप्रहरच्या ‘स्थित्यंतर’ या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
प्रकाशन समारंभाला ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले, व्यवस्थापक दादाराम मिसाळ, वृत्तसंपादक समाधान पाटील, उपसंपादक संदीप बोडके, तन्वी गायकवाड, आर्टिस्ट अरुण चवरकर, शशिकांत बारसिंग, प्रवीण गायकर, रूपेश चिंगळे, मल्हार टीव्हीचे संपादक नितीन कोळी आदी उपस्थित होते.
‘रामप्रहर’च्या दिवाळी विशेषांकात लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे जीवनकार्य आणि नवी मुंबई विमानतळ यांचा वेध घेणारा विशेष लेख आहे. याशिवाय पनवेल, रायगडसह विविध क्षेत्रांतील स्थित्यंतराचा आढावा घेण्यात आला आहे तसेच कथा, कविता, व्यंगचित्रेही आहेत. याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, ’रामप्रहर’च्या दिवाळी विशेषांकासाठी व्यवस्थापन सल्लागार एच. बी. देशमुख, उपसंपादक वसंत ठाकूर, लेखापाल उद्धव घरत, छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर, वितरक महेश काळे, कार्यालयीन सहाय्यक सुबोध ठाकूर, सुरज पाटील यांचेही सहकार्य लाभले.