उरण दि. २८ (विठ्ठल ममताबादे) मंगळवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी खरोशी गावातून वाहणारी भाल नदी त्या नदीत ७.५ फुटीचा एक इंडियन रॉक पायथॉन जातीचा अजगर अर्ध मेलेल्या अवस्थेत पडून होता तेथील रहिवाशी असणारे गणेश घरत यांनी त्या अजगराला पाहताच त्वरित सर्प मित्र तेजस पाटील आणी राजेश म्हात्रे यांना बोलावले त्यांनी क्षणाचा ही विलंब न लावता त्या अजगराला नदीतून बाहेर काढून त्या वरती प्राथमिक उपचार करून डोक्यावरती असणाऱ्या जखमेला बेटाडीन लावून काही तासानंतर खरोशी भागातील जंगलात सोडून दिला. एका अर्ध मेल्या अजगरास दोघा सर्पमित्रानी जीवनदान दिल्या मुळे वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे खरोशी आणी जिते गावातील सर्प मित्रांचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!