पनवेल दि.१०: नाट्यलेखक, दिग्दर्शक भास्कर पाटील यांच्या दोन नव्या नाट्यपुस्तकांचे प्रकाशन नुकतेच झाले.
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व राजदत्त यांच्या हस्ते त्यांच्या निरागस आणि बीज या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले.
पनवेल तालुक्यातील शिवकर गावचे मुळ रहिवाशी असलेले लेखक, दिग्दर्शक भास्कर पाटील यांनी अनेक नाटकांचे लेखन केले आहे.
त्यांनी दिग्दर्शन केलेल्या अनेक नाटकांना राज्यनाट्य स्पर्धेत राज्यस्तरीय पारितोषिक मिळालेले आहे.
अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये देखील त्यांनी मागील अनेक वर्षे उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
कोशिश, निर्धांर पथनाट्य, मुन्नाभाई एसएससी, स्वप्न चित्रपटाचे कथालेखन अनेक व्यवसायिक नाटक आदींचे लेखक म्हणून परिचित असलेल्या भास्कर पाटील यांनी निरागस आणि बीज या दोन नाट्यपुस्तकांचे लेखन केले आहे.
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व राजदत्त यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी या पुस्तकप्रकाशन सोहळा दिवाळी पाडव्याच्या दिवशी पार पडला.
यावेळी लेखक भास्कर पाटील यांच्यासह चँम्पियन्स राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक रमेश मोरे,
टिव्ही सिरियलचे एडिटर भक्ती मायाळू, कवियत्री गीतकार यशश्री मोरे आदी उपस्थित होते.
भास्कर पाटील यांच्या पुस्तकाबद्दल बोलताना राजदत्त यांनी लेखकांना मोलाचा सल्ला दिला. कोणतेही काम करताना मेहनतीने, झोकून द्या, परिश्रम कराल तर नक्की यश येते असे मत त्यांनी व्यक्त केले.
तर कोणतेही काम यशस्वी करण्यासाठी खतपाणी गरजेचे आहे, त्याप्रमाणे लेखन करायचे असेल तर समाजाकडे संवेदने पाहता आले पाहिजे. इतरांचे विचार वाचले पाहिजे, ऐकले पाहिजेत. तरच तुमचे लेखक चांगल्या दर्जांचे होवून तुम्ही दर्जेदार लेखक होवू शकता असा विश्वास व्यक्त करीत भास्कर पाटील यांना पुस्तक प्रकाशनाबद्दल शुभेच्छा दिल्या.
माझ्या पुस्तकांचे प्रकाशन राजदत्त यांच्या हस्ते होणे हे मी माझे भाग्य समजतो. पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात करण्याचे नियोजन होते, मात्र करोनाचा प्रादुर्भांव आणि राजदत्त यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे करता आला नाही असे त्यांनी बोलताना सांगितले.
