पनवेल दि.२२: नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यासाठी तसेच कॉकिटीकरण करण्याच्या मागणीसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या आंदोलनापुढे सिडको प्रशासन नमले असून येत्या रविवार पर्यत्त उड्डाणपुलावरील खड्डे भरण्याचे तसेच आढवड्याभरात उड्डाणपुलाच्या चारी बाजूंचे काँक्रिटीकरण करण्याची निवीदा काढण्यात येईल असे आश्वासन सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले. त्यानंतर भरपावसात सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र जर येत्या आठवड्या भरात हे काम झाले नाही तर आमच्यासाठी आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनीआज झालेल्या रस्तारोको आंदोलनावेळी सिडको प्रशासनाला दिला.

नवीन पनवेल माथेरान महामार्गाला जोडणाऱ्या या पूलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे, वाड्या, पाडे जोडली असून दळणवळणाचा हा प्रमुख मार्ग आहे. या उड्डाण पुलाची पावसामुळे दूरवस्था झाली आहे. या खड्ड्यामुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी झाले अलस्याच्या घटना घडल्या आहेत. या पूलावरील रहदारीचा विचार करता पूलाच्या उतारावरील दोन्ही बाजूला सिमेंट कॉकेटीकरण होणे गरजेचे असताना सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा उड्डाण पूल खड्डे मुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज भर पावसामध्ये पूलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. आंदोलकांनी रस्ता अडवल्यावर सिडकोचे बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंत्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना भेटून आम्ही दोन महिन्यात टेंडर प्रोसेस सुरू करतो तुम्ही आंदोलन मागे घ्या सांगत होते. पण त्याला नकार देऊन सर्वांनी पावसात रस्त्यावर ठाण मांडले तर काहीजण रस्त्यावर झोपले. शेवटी सिडको प्रशासन या आंदोलनापुढे नमले असून येत्या सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी येत्या रविवार पर्यत या उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यात येतील तसेच आठवड्याभरात या पुलाच्या चारी बाजूंचे कॉकिटीकरण करण्याची निवीदा काढण्यात येईल असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांना फोन करून दिले. त्यानंतर भरपावसामध्ये सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात पनवेल महापालिकचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनिल घरत, माजी नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ, संतोष शेट्टी. नितिन पाटील, अजय बहिरा, मनोहर म्हात्रे, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला धरत, अॅडव्होकेट वृशाली वाघमारे, राजश्री वावेकर, भिमराव पोवार, शशिकांत शेळके, दक्षिण भारतीय सेलचे जिल्हा संयोजक श्रीनिवास कोहरु, अॅडव्होकेट जितेंद्र घरत, माजी नगरसेविका संगीता कांडपाल, गौरव कांडपीळे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, पंचायत समितीचे सदस्य राज पाटील, भाजप युवामोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, खांदाकॉलनी युवामोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, उदीत नाईक, विवेक होन, अक्षय सिंग, देवांशू प्रभाळे, अशोक आंबेकर, पप्पू साळवे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हाणाले की, सिडको प्रशासन आंदोलनासाठी दिलेल्या नोटीशीची दखल घेत नाही हे या आजच्या आंदोलनातून पुन्हा समोर आले आहे. जो पर्यंत हा पुल महापालिकेकडे हस्तांतरीत होत नाही तो पर्यंत या पुलाची जबाबदारी सिडको प्रशासनाची आहे मात्र सिडकोचे अधिकारी कामचुकारपणा करत असल्यामुळे नागरीकांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दुर्देवाने सिडको आंदोलन केल्या शिवाय कोणताही निर्णय घेत नाही असे सांगीतले तसेच दिलेले आश्वासन पाळले गेले नाही तर आमच्या पुढे पुन्हा आंदोलन करण्यासाठीचा मार्ग मोकळा आहे असा इशारा सिडको प्रशासनाला दिला.

दरम्यान गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. असे असले तरी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संदीप पाटील यांच्या पुढाकाराने पुकारलेल्या या आंदोलनात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. सर्वांनी पावसात भिजत सिडको विरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत उड्डाणपुलाच्या काँक्रिटीकरणाचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. सिडकोने नमते धोरण घेत त्वरित याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

रुग्णवाहिकेला दिली वाट

एचडीएफसी सर्कल येथे रस्ता रोको केल्यामुळे पनवेल माथेरान रोड वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. खांदा कॉलनी आणि पोदी मार्गे वाहने वळवण्यात आले. यादरम्यान एक रुग्णवाहिका अडकल्याचे पाहून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार रुग्णवाहिकेला वाट करून देण्यात आली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!