अलिबाग दि.23: भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि.1 ऑगस्ट 2022 पासून सर्व मतदारांना आपल्या मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड संलग्न करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखालील रायगड जिल्ह्यातील मतदारांची मतदार ओळखपत्रासोबत आधार जोडणी करण्यासाठी जिल्हा अंतर्गत विविध उपक्रम व विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व हौसिंग सोसायटीमध्ये आधारकार्ड मतदार कार्डसोबत लिंक करणे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यासाठी हौसिंग सोसायटीमधील नागरिकांना आवाहन केले आहे.
ज्या नागरिकांना आपल्या हौसिंग सोसायटीमध्ये आधार जोडणी शिबीर आयोजित करावयाचे आहे त्यांनी आपल्या जवळील मतदार नोंदणी कार्यालय (तहसील/ उपविभागीय अधिकारी कार्यालय) येथे संपर्क साधावा.
कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक:-
188 पनवेल विधानसभा मतदारसंघ- 022-27452328 / 022-27469134
189 कर्जत विधानसभा मतदारसंघ- 02148-223499
190 उरण विधानसभा मतदारसंघ- 022-27222129
191 पेण विधानसभा मतदारसंघ- 02143-253000
192 अलिबाग विधानसभा मतदारसंघ- 02141-224434
193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ- 02147-222435
194 महाड विधानसभा मतदारसंघ- 02145-222136