कळंबोली दि.१६: रायगड जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळा मधील शिक्षक ,मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची संघटना कार्यरत आहे. या संघटनेचा वर्धापन दिन शुक्रवारी पनवेल तालुक्यात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम संघटनेच्या सदस्यांनी आयोजित केले होते .त्यामध्ये सर्वच शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन संघटनेचा वर्धापन दिन सोहळा उत्साह पूर्ण वातावरणात साजरा केला.
रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना ही शासनाकडे नोंदणीकृत संघटना आहे .या संघटनेचा चौथा वर्धापन दिन पनवेल तालुक्यातील विविध शाळांमधून मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला .कळंबोलीतील मराठी प्राथमिक विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, नवीन पनवेल येथील श्री संत साईबाबा प्राथमिक विद्यालय व पनवेल मधील के.वी कन्या विद्यालय, तसेच खारघर कामोठा, तळोजा येथील प्राथमिक विद्यालयातून शिक्षक संघटना वर्धापन दिन मोठ्या उत्साह पूर्ण वातावरण साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांना पेन, पुस्तक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संघटनेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास सहकार्य करण्यात आले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सुधाकर जैवळ, सचिव यशवंत मोकल, जिल्हा कार्यकारणी सदस्य मेघा मोरे, ज्ञानेश्वर ठाकूर,दशरथ म्हात्रे, तसेच मुख्याध्यापिका वनिता कोळी, वैशाली पाटील सुजाता भोसले, अनंता ठाकूर, तसेच मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या वर्धापन सोहळ्यात सहभागी झाले. विद्यालयातील निवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गानेही या सोहळ्यात सहभाग नोंदवला.प्रत्येक शाळेत संघटनेच्या सदस्यांनी विविध उपक्रम राबवून संघटनेचा चौथा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.