Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps

कोळ्यांचे समुद्राच्या पाण्याशी असलेलं नातं कुमार प्रभात कोळीने वेगळ्या प्रकारे जपलं, त्याची नोंद राज्य,राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरावर घ्यावी लागली !

पनवेल दि.४: महाराष्ट्र शासनाचा खाडी पोहणे प्रकारातील मानाचा शिव छत्रपती पुरस्कार प्रभात कोळी यास २२ फेब्रुवारी २०२० रोजी देण्यात आला. यापूर्वी ऑगस्ट २०१९ रोजी प्रभात ला केंद्र शासनाचा साहसी जलतरण प्रकारातील मानाच्या तेनझिंग नोर्गे पुरस्कार २९ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्याच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले होते त्यामुळे प्रभातचे शिव छत्रपती पुरस्कारासाठी थेट निवड करण्यात आली. ४ ऑगस्ट २०१८ रोजी सात समुद्राच्या आव्हानांपैकी सर्वात खडतर नॉर्थ चॅनेल पार करणारा प्रभात हा जगातील सर्वात तरुण जलतरणपटू ठरल्याने त्याच्या ह्या पराक्राची नोंद घेत प्रभातचे नाव गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले. या सर्व मिळालेल्या पुरस्काराविषयी तसेच श्री रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे तासंतास केलेला पोहण्याचा सराव या विषयी प्रभात कोळी शी खबरबात ने केली खासबात.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!