Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps

पनवेल दि.२९: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान स्वर्गीय जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार सोहळा खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात स्व. जनार्दन भगत यांच्या स्मृती प्रित्यर्थ पहिल्या पुरस्काराने रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, थोर विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रक्कम पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सोहळ्याचे संयोजक व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, विशेष अतिथी म्हणून उद्योग, खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, एन. डी. पाटील यांच्या सुविद्य पत्नी सरोजिनी पाटील, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगिरथ शिंदे, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, उपमहापौर जगदिश गायकवाड, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, रयत संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य संजीव पाटील, मीना जगधने, दशरथ भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संचालक शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, संजय भगत, हरिचंद्र पाटील, अनिल भगत, संजय पाटील, अतुल पाटील, नगरसेवक सतीश पाटील, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सोप्पे रस्ते चालायला सुरळीत असले तरी ते जिथे तुम्हाला जायचे असतील तिकडेच ते नेतीलच असे नाही. मळलेल्या वाटेने कुणीही जातो पण न मळलेल्या वाटेवरून चालतो तो स्वतःचा मार्ग तयार करतो. तोच जीवनात यशस्वी होतो असे सांगून स्व. जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये सत्काराला उत्तर देताना प्रा. एन. डी. पाटील यांनी संवाद साधला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!