पनवेल दि.२७: मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवसाचे औचित्य साधून संगीतकार अनिरुद्ध भिडे यांनी “माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा” या कवितेच्या ओळींना चाल लावून खबरबात ३६० ने आपल्या माध्यमातून आपणा पर्यंत हे काव्य पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.
गीत – कुसुमाग्रज, संगीत – अनिरुद्ध भिडे, स्वर – अनिरुद्ध भिडे, तबला – आदित्य उपाध्ये, व्हिडिओ – प्रणय पवार.