रत्नागिरी दि.८ (सुनिल नलावडे) तेरशे शिंमगोत्सवाचे पहिले होम शनिवारी दुपारी 11.30 च्या मुहुर्तावर लागले. करजुवे गावातील गावकरी, मानकरी यांनी होळदेवाची पुजा करून पारंपारिक पध्दतीने मंगलाष्टके झाल्यावर फेर धरत सनई वादयांच्या जयघोषात माड व आंब्याच्या होळीला प्रदषिणा घालून होम लावले. या होलीकोत्स्वाला ठिकठिकाणी राहत असलेले गावकरी आपल्या मुळ गावी आले होते. त्यांच्या उपस्थितीत होलीकोत्स्व दिमाखदारपणे पार पडला. तेरशेचा होम लागल्यावर होळीच्या खुटावर समस्त मानकऱ्यांनी, गावकऱ्यांनी पाच प्रदशिणा घालून आपल्या माना प्रमाणे नारळ पेटलेल्या होळीला अर्पण केले. नंतर नव दापत्यांनी सुध्दा होमात नारळ अपर्ण करून पालखी नाचवण्यात आली. नंतर माहेरवासिनींनी बोलले नवस हे तिथे फेडले जातात. तळेकरीन देवी हि माहेरवासिनींच्या हाकेला धावून जाते अशी अख्यायिका आहे. त्यामुळे तेथे नवस बोलून फेडले जातात व नविन नवस केले जातात. करजुवे गावची ग्रामदेवता देवी तळेकरीन आई हिच्या शिमगोत्सवाला मोठया संख्येने भाविक मंदिरात आले होते. तळेकरीन देवीच्या या होलीकोत्वाा्त तळेकरीन देवीच्या नावाने भंडारा होतो. या भंडाऱ्यांला मोठया संख्येने भाविकांनी आपले योगदान दिले. भंडारा अत्यंत शिस्तबध्दरित्या झाला. हा होलीकोत्सव शिस्त बध्द होण्याकरिता गावातील मानकरी, गावकरी व देवूळ व्यवस्थापन समितीने अत्यंत मोलाचे काम करून हा उत्सव आनंदात व उत्साहात पार पाडून या उत्सवाची शान वाढवली.