मुंबई, दि. 15 : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.18 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11.00 ते 4.00 या वेळेत चित्रपटसृष्टीत प्रवेश करु इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी ऑडिशन, मार्गदर्शन कार्यशाळा पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटर येथे आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा विनामूल्य स्वरुपाची असेल. या कार्यशाळेसाठी चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक, छायाचित्रकार, अभिनेते यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. चित्रपटसृष्टीत नव्याने प्रवेश करु इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार असून ऑडिशन कसे द्यावे याबाबत सखोल मार्गदर्शन होणार आहे. यास्तव या कार्यशाळेत इच्छुकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन बिभीषण चवरे, प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्यातर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या 022-24308876 या क्रमांकावर संपर्क करावा.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!