पनवेल दि.४: आपल्या खिशातील पैसे खर्च करून समाजोपयोगी कामे करणारे मोजकीच आहेत मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर हे सतत आणि अखंडपणे समाजाची सेवा करण्याचे काम करत आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी सामाजिक वसा जपला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी आज खांदा कॉलनी येथे झालेल्या आरोग्य महाशिबिरात केले.
लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने (रविवार, दि.०४ ऑगस्ट) १६ वे ‘विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर’ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्कृष्ट नियोजनात पार पडला. या महाशिबिराचे उदघाटक म्हणून आमदार रवीशेठ पाटील बोलत होते.
आ. पाटील यांनी पुढे म्हंटले कि, डॉक्टर हे गुणकारी असतात त्यांच्याकडे देवरूपाने पाहिले जातात. सन २००६ पासून कोरोनाचे दोन वर्षे अपवाद वगळता हे महाशिबीर अखंडपणे सुरु आहे. त्याचे नियोजन उत्तम असल्यामुळेच हा उपक्रम अविरतपणे सुरु आहे, त्यामुळे या उपक्रमाला तोड नसून हि सेवा फक्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे या विभागाला मिळाली आहे. नावाने खूप दानशूर होतात पण कर्तृत्वाने खरे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत, असे त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून नमूद करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी सेवेचे व्रत घेतलेच आहे पण त्याचबरोबरीने येथील माणसाला काय आवश्यक आहे याची जाणीवही त्यांच्याकडे आहे, त्याप्रमाणे त्यांच्याकडे कामाचा वसा असून विधिमंडळातील ते एक बुलंद आवाज आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. लोकनेते रामशेठ ठाकूर गरीब कुटुंबात जन्मलेले आहेत आणि याची जाणीव त्यांनी कायम ठेवली आहे आणि तीच जाणीव त्यांच्या कुटुंबात रुजली आहे, त्यामुळे या कुटुंबाकडून नेहमीच चांगले कार्य करत कायम सामाजिक बांधिलकी जपली जात आहे, असेही त्यांनी आमदार रवीशेठ पाटील यांनी अधोरेखित केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून, हे महाशिबीर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर, संस्था व त्यांचे सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांचे योगदान महत्वाचे ठरले असल्याचे सांगितले आणि त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन त्यांच्याप्रती आभार मानले. अनेकदा कामाचे कौतुक होत असते पण देवाने दिले ते समाजासाठी देणे आपले कर्तव्य आहे, आपणही समाजाचे देणेदार लागतो या भावनेतून काम करण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकीला प्रथम प्राधान्य देत असतो असे सांगतानाच वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करताना आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर असलेले प्रेम कायम वृद्धिगत करा, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले.
यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आमदार प्रशांत ठाकूर यांनी, महाशिबिराच्या प्रथम ते आजपर्यंतच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. या शिबिरातून लोकांची सेवा करण्याची ताकद डॉक्टर व त्यांच्या संस्था, सहकारी, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामुळे मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वतः आरोग्यदायी राहणे गरजेचे आहे मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आरोग्य तपासणी करत नाही त्यामुळे एखादा आजार झाला तर त्यावेळी केलेल्या तपासणीवेळी आणखी व्याधी लागतात त्यामुळे या व्याधी टाळण्यासाठी वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी गरजेचे आहे. मात्र अनेक लोक विशेषतः ग्रामीण भागातील माणूस दुर्लक्ष करतो त्यामुळे या शिबिरातून त्याची तपासणी होऊन योग्य उपचार देण्यासाठी या शिबिराचे आयोजन दरवर्षी केले जात असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात जनआरोग्य योजना तर राज्यात वैद्यकीय सहाय्यता केंद्र सुरु केले आहे. पूर्वी आमदारांनी शिफारस केल्यावर रुग्णांना १५ ते २० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत होती मात्र देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी हजाराचे स्वरुप बदलून ती लाखात केली आणि त्या अनुषंगाने मी शेकडो रुग्णांना मोठ्या स्वरूपात मदत करू शकलो, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. वैद्यकीय दृष्टिकोनातून डॉक्टर जनजागृती करतात त्याप्रमाणे ज्येष्ठ डॉक्टर गिरीष गुणे यांनी सेवाभावी रूपाने काम करून आदर्श निर्माण केला आहे, त्याचप्रमाणे इतर डॉक्टर आणि संस्था काम करीत आहेत. या सर्वांचे नेहमीच सहकार्य लाभतो असे सांगतानाच त्यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून बोलताना प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. गिरीश गुणे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना समस्त डॉक्टर परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पुढे म्हंटले की, या महाशिबिराच्या पहिल्या शिबिरापासून ते आतापर्यंतच्या शिबिरात मी सहभाग घेतला आहे. पहिल्यावेळी चार ते पाच हजार नागरिक लाभ घेत होते ती संख्या आता १२ ते १४ हजाराच्या आसपास गेली आहे. विशेषत्वाने काळानुसार शिबिरात आवश्यक असलेले बदल यात समाविष्ट करण्यात आले त्यामुळे तळागाळातील लोकांची गरज ओळखून त्यांना शिबिराच्या अनुषंगाने उपचार देण्याचे काम होत आहे. कोणताही उपक्रम राबविताना त्यातील नियोजन महत्वाचे असते, आणि तशाप्रकारचे नियोजन या शिबिरात असते त्यामुळे सेवा घेणाऱ्याला जसा आनंद होतो तसा सेवा देणाऱ्यालाही समाधान होतो.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार महेश बालदी यांनी, समाजासाठी सतत काम करणाऱ्या आणि नेहमीच समाजहित जपणाऱ्या अशा सामाजिक कल्याणाचा हा वाढदिवस असल्याचे म्हंटले. फक्त वाढदिवसापुरते नाही कायम सामाजिक उपक्रम हा राबवत असल्याचे यावेळी अधोरेखित केले. वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे आणि नवीन तंत्रज्ञान समाविष्ट करून त्याप्रमाणे उपचार देण्याचे काम डॉक्टर मंडळी करत असतात. या शिबिराच्या माध्यमातून हजारो नागरिक लाभ घेत असतात त्यामुळे स्वास्थ ठीक ठेवण्यासाठी चांगली मदत होत असते. असे सांगतानाच मागील वर्षांपासून आम्ही आदिवासी वाड्यांमध्ये फिरता दवाखाना सुरु केला आहे त्या धर्तीवर जिल्ह्यातील दुर्गम भागातील प्रत्येक वाडीवर स्पेशल अभियान राबविण्याची मागणी त्यांनी डॉक्टरकांकडे यावेळी केली.
यावेळी रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले यांनी आपल्या भाषणात, समाजासाठी काम करणे हे लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांचा स्थायीभाव असल्याचे सांगितले. तसेच आमदार महेश बालदी यांनी सूचित केल्याप्रमाणे रायगड मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आदिवासी भागासाठी स्पेशल कॅम्प घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या महाशिबिरात सर्वसाधारण रोग, बालरोग, महिलांचे आजार, त्वचारोग, हृदयरोग, दंतरोग, हाडांचे रोग, ईसीजी, मधुमेह, नाक-कान-घसा, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, क्षयरोग, कॅन्सर अशा विविध प्रकारच्या तसेच सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या तज्ज्ञांमार्फत करून सल्ला आणि औषधोपचार मोफत करण्यात आले. त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप, तसेच दिव्यांगांना प्रमाणपत्र, अपंगांना तीन चाकी सायकल, कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. त्याचबरोबरीने आयव्हीएफ उपचार, तसेच अवयवदानाचे फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली होती. शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या महाशिबिरात मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार देण्याबरोबरच त्यांची भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. महाशिबिर यशस्वी करण्यासाठी नामांकित वैद्यकीय संस्थांचे एकूण ३०० हुन अधिक वैद्यकीय तज्ञ् व त्यांचे सहकारी, विविध समिती, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवकांचे योगदान लाभले. शिबिर यशस्वी केल्याबद्दल श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, डॉ. समीर सहस्त्रबुद्धे, उपजिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब फाळके, डॉ. शुभदा निल, कर्करोग तज्ञ डॉ. पुष्कक, डॉ. राजेंद्र कापसे, माजी महापौर कविता चौतमोल, भाजपचे पनवेल शार अध्यक्ष अनिल भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी नगरसेवक व समन्वयक डॉ. अरुणकुमार भगत, माजी नगरसेवक हरेश केणी, मनोहर म्हात्रे, मनोज भुजबळ, एकनाथ गायकवाड, राजू सोनी, अमर पाटील, अजय बहिरा, तेजस कांडपिले, प्रभाकर बहिरा, विकास घरत, विजय चिपळेकर, माजी नगरसेविका सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, मोनिका महानवर, नीता माळी, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, तालुकाध्यक्षा कमला देशेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ज्ञानेश्वर घरत, माजी पंचायत समिती सदस्य राज पाटील, अमोघ ठाकूर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, अमरीश मोकल, शशिकांत शेळके, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!