पनवेलदि. ५: आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, महिलांना कर्करोग प्रतिबंधक लस, भजन स्वरपुष्प, क्रीडा स्पर्धा, शालेय साहित्य वाटप, अशी विविध सामाजिक कार्यक्रमे मोठ्या उत्साहात साजरे झाले. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले वडील लोकनेते रामशेठ ठाकूर व आई शकुंतला ठाकूर यांचे आशिर्वाद घेतले. वाढदिवसानिमित्त राज्यातील नेते मंडळींसह, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, विधी, वैद्यकीय, पत्रकारिता, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विविध संस्था, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ‘एक झाड आई साठी’ हा उपक्रम देशभर राबविला जात आहे, त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून केलेल्या आवाहनानुसार आयोजित कार्यक्रमात हजारो वृक्षांचे रोपण करण्यात आले. एखाद्या कार्यक्रमात वृक्ष भेट दिल्याने त्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलून जाते त्याचप्रमाणे वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन केल्याने मानवी जीवनास अनुकूल असे वातावरण निर्माण होते. यंदाच्या उन्हाळ्यात ४० डिग्री पेक्षा जास्त तापमान सर्वाना अनुभवायला मिळाला आहे, याची पुनरावृत्ती होण्यापेक्षा आपण वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन यावर भर देण्याची गरज आहे आणि या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनानुसार पनवेल तालुक्यातील आंबिवली (नेरे) येथे जवळपास ०२ हजार वृक्षांचे रोपण कऱण्यात आले आणि त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने घेतली आहे. वाढते औद्योगिकीकरण, इमारतींचे पसरणारे जाळे, अमर्याद वृक्षतोड यामुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे. त्याचा परिणाम पर्जन्यवृष्टीवर होत असल्याने अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पिकांची नासाडी, भूकंप, महापूर, अनियमित ऋतुमान, वाढते प्रदूषण अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र आपण पाऊस आणि निसर्गाला दोष देऊन मोकळे होतो, पण मानव म्हणून निसर्गाचे रक्षण करणे हि आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करतानाच वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन असा उपक्रम या निमित्ताने राबविण्यात आला.

ज्येष्ठांचे आशीर्वाद माझ्यासाठी बहुमोल – आमदार प्रशांत ठाकूर
चंदनाप्रमाणे झिजून ज्येष्ठांनी आपले आयुष्य कुटूंब व समाजासाठी वेचले आहे, त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनातून समाज घडत आहे, त्यामुळे ज्येष्ठांचे आशीर्वाद माझ्यासाठी बहुमोल आहेत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथे केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘खारघरचा राजा’ संस्थेच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा छत्री वाटप तसेच ज्येष्ठ महिलांना साडी व ज्येष्ठ पुरुषांना शर्ट व पॅन्टपीस वाटप करण्यात आले. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसह विविध संस्था संघटना तसेच विविध समाजाच्या प्रतिनिधींनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिष्टचिंतन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, कार्यक्रमाचे आयोजक विजय पाटील, माजी सरपंच विजया पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आशीर्वादाबद्दल ज्येष्ठ नागिरकांचे मनःपूर्वक आभार मानले. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रमे राबविले जात आहे आणि वर्षातून किमान २० कार्यक्रमे ते आयोजित करून समाजाची मोठी सेवा करत असल्याचे सांगून खारघरचा राजा संस्थेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. महिलांच्या सन्मानासाठी माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली, उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलींना पूर्णपणे आर्थिक पाठबळ, दरवर्षाला तीन सिलेंडर मोफत अशा विविध योजना आणल्या त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे आभार मानत असून अशा विविध योजनांच्या माध्यमातून सरकार लोकापर्यंत पोहोचत असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी नमूद केले.

सर्वाइकल कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड जिल्हा उत्तर भारतीय मोर्चा, नमो नमो मोर्चा, पंडित पारसनाथ शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट आणि सखी वुमन वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर येथे ९ ते १८ वयोगटातील मुलींसाठी सर्वाइकल कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर पार पडले. या शिबिराला लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, गुरुनाथ गायकर, माजी नगरसेविका संजना कदम, नेत्रा पाटील, प्रशांत कदम, समीर कदम, दिलीप जाधव, आयोजक संतोष शर्मा, साधना पवार, रामचंद्र पाटील, अमित, राजेंद्र मांजरेकर, अजय माळी, स्नेहा जाधव, सुरेश म्हात्रे, अमर उपाध्याय, निर्मला यादव, संदेश वर्मा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!