कळंबोली दि.१३: ५२ व्या पनवेल तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सु.ए.सो.माध्यमिक विद्यालय बेलवली शाळेची इयत्ता १० वित शिक्षण घेणाऱ्या पायल अरविंद पाटील हीने वकृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक मिळून तालुक्यामध्ये विज्ञान भरारी घेतली आहे. तिचे शाळा , संस्था, शाळा व्यवस्थापन समिती व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे.
उलवे येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये पनवेल तालुक्यातील सर्वच शाळा सहभागी झाल्या होत्या. हजारो विद्यार्थ्यांनी या तालुका विज्ञान प्रदर्शनात आपले कसंब पणाला लावून विविध कलाकृती, विज्ञान कृती, निबंध स्पर्धेत सहभाग घेऊन आपले आणि आपल्या शाळांचे नाव उंचावले. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या बेलवली येथील माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या पायल अरविंद पाटील हिने निबंध व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तालुक्यामध्येच विज्ञान भरारी घेतली आहे. या हुशार विद्यार्थिनीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. बेलवली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार गावंड यांनी या विशेष व घवघवीत यश मिळवणाऱ्या पायल पाटील चे अभिनंदन केले. पायल पाटील ला विज्ञान प्रदर्शन समितीकडून स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. पनवेल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सिताराम मोहिते, शालेय पोषण आहार अधीक्षक नवनाथ साबळे, तसेच शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक स्तरातून पायल पाटील चे अभिनंदन केले जात आहे.