दहा लाख रुपये किमतीची औषधे व वैद्यकीय उपकरणे
पनवेल, दि.६: पनवेल येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा रुग्णालयात औषधांचा तूटवडा भासत असताना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत विस्टा प्रोसेसेड फूड्स च्या सी एस आर अनुदान फंडा द्वारे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा हॉस्पिटल मध्ये दहा लाख रुपये किमतीची औषधे व वैदयकीय उपकरणे तातडीने हस्तांतरित करण्यात आली. त्याचा फायदा अनेक गोर गरीब गरजू रूग्णांना होऊ शकेल.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. गीते यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्तावना करताना या हॉस्पिटलचा फायदा पनवेल शहर तसेच तालुक्यातील लाखो रुग्ण घेत असल्याचे सांगितले. ऍड. प्रथमेश सोमण यांनी मार्गदर्शन करताना चंद्रशेखर सोमण यांनी अनेक वर्षे या हॉस्पिटल साठी कसे प्रयत्न केले व या हॉस्पिटल द्वारे अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून फायदा करून दिला याची माहिती करून दिली. त्याच बरोबर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या डॉ. गिरीश गुणेंच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार्या प्रामाणिक समाजसेवेचे कौतुक केले. रोटरी प्रांत 3131चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांनी मार्गदर्शन करताना रोटरी च्या माध्यमातून या उप जिल्हा हॉस्पिटल ला विविध वैद्यकीय उपकरणे वेळोवेळी रोटरी क्लब च्या मार्फत उपलब्ध करून दिली असल्याचे सर्व उपस्थितांच्या निदर्शनास आणले. पनवेल शहर पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ठाकरे यांनी रोटरी क्लब, उप जिल्हा रुग्णालय व विस्टा प्रोसेसेड फूड्स यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचे वेळोवेळी सहकार्य पोलिसांना देखील मिळत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी विस्टा प्रोसेसेड फूड्सचे प्रमुख भुपिंदर सिंग, सल्लागर चंद्रशेखर सोमण, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, शिवसेना नेते ऍड. प्रथमेश सोमण यांचे शिवाय शिवसेना उप महानगर प्रमुख महेश सावंत, पोलिस निरीक्षक अभंग, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे प्रेसिडेंट, शैलेश पोटे, सचिव दीपक गडगे, खजिनदार ऋषिकेश बुवा, प्रसाद सोनावणे, माजी अध्यक्ष डॉ. आमोद दिवेकर, डॉ. लक्ष्मण आवटे, डॉ. हितेन शाह, संतोष घोडिंदे, लक्ष्मण पाटील, भगवान पाटील पुढील नियोजित अध्यक्ष, विवेक वेलणकर अनिल ठकेकर यांचे सह सर्व रोटरी सदस्य व हॉस्पिटल चे सहकारी डॉक्टर्स, नर्सेस, फार्मासिस्ट, काही जेष्ठ नागरिक आदि मान्यवर उपस्थित होते.