पनवेल दि.३१ : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजयी खाते उघडले आहे. भाजपचे प्रभाग १८ ब मधील उमेदवार नितीन जयराम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. विरुद्ध उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे ते बिनविरोध झाले आहेत.
प्रभाग १८ च्या ब जागेसाठी भाजपकडून नितीन जयराम पाटील आणि शेकाप आघाडीकडून रोहन अरविंद गावंड यांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी अर्ज दाखल केले होते. या अर्जाची छाननी आज झाली. यामध्ये रोहन गावंड यांच्या जात पडताळणीच्या कागदपत्रांची योग्य पूर्तता न झाल्याने शेकापचे रोहन गावंड यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी पावन चांडक यांनी गावंड यांचा अर्ज बाद केला असल्याचे जाहीर केले. याठिकाणी फक्त दोनच जणांनी अर्ज दाखल केल्याने भाजपचे नितीन जयराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने ते बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!