पनवेल दि.११ (संजय कदम) : पनवेल-उरण रेल्वे रेल्वे ट्रॅकला लागुन असलेले साईटवर गव्हाणफाटा परिसरात ३ लाख रुपये किमतीची कॉपर केबल चोरून नेणाऱ्या एका आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या आणखी ३ साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
आरोपी शिवप्रसाद गौतम (वय २०, रा. दिवाळे गाव) ह्याने अनिल, अवधेश व आणखी एका इसमाने आपसात संगणमत करुन पनवेल-उरण रेल्वे रेल्वे ट्रॅकला लागुन असलेले साईटवर गव्हाणफाटा परिसरात असलेली ३ लाख रुपये किमतीची ७७मीटर लांबी असलेली कॉपर केबल कापुन नेली. तसेच L2D Boomer मशीनचे देखील नुकसान केले. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांकडे तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे तसेच हेड कॉन्स्टेबल योगेश दिवेकर यांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीदाराच्या साथीने आरोपी शिवप्रसाद गौतम याला अटक केली. त्याच्या कडून पोलिसांनी ५६ हजार रुपये किमतीची १४ मीटर लांबीची कॉपर केबल तसेच ५ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी डिझायर गाडी जप्त केली आहे. त्यांच्या आणखी ३ साथीदारांचा शोध हेड कॉन्स्टेबल योगेश दिवेकर करीत आहेत.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!