पनवेल दि. १३: खांदेश्वर पोलीस ठाण्याचे शिपाई सलीम तडवी बेजबाबदारपणे वागत असून त्यांच्या वर्तनाबद्दल पनवेल तालुक्यातील माजी नगरसेवक संतोष हिरामण उरणकर यांनी निवेदन तक्रार अर्जात केली आहे.
संतोष उरणकर यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीचे कौतुक करून तेथील शिपाई सलीम तडवी अपवाद असल्याचे सांगत बेजबाबदारपणे कसलीही भीती न बाळगता ते पासपोर्ट चौकशीच्या कामात बेडरपणे पैशाची मागणी करत उद्धटपणे वागत नागरिकांना त्रास देतात असे उल्लेखले गेले आहे.
या गंभीर घटनेची तक्रार त्यांनी माननीय पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्वर यांच्याकडे अर्जाद्वारे केली असून शिपाई सलीम तडवी यांची या विषयी चौकशी लावण्यात यावी तसेच त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या तक्रारीमुळे पोलीस प्रशासन व सामन्य नागरिकांमधील अविश्वास व तणावाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. या गंभीर विषया प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी कशा पद्धतीने कारवाई करून नागरिकांच्या अडचणीचे समाधान करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सलीम तडवी हे पैसे दिले कि खुश असतात नाहीतर गरिबांचे काम असले कि त्यांच्याशी अरेरावीने बोलणे करत असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत तरी तडवी यांना तात्काळ इतरत्र बदली करावी अशी मागणी होत आहे.
![]()
