अलिबाग दि. १०: 33 मावळ लोकसभा मतदारसंघात क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे यासाठी सोमवार 13 मे 2024 रोजी भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
जिल्हातील 33 मावळ लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात सोमवार 13 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी अशा सर्व मतदारांना भरपगारी रजा देय आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी /कर्मचारी /रोजंदारी कर्मचारी यांना सोमवार दिनांक 13 मे रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचे आदेश पुढील शर्ती/अटीस अधिन राहून देय आहे.
1) सदर आदेश हा शासकीय आस्थापना/खासगी आस्थापना/रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना/दुकाने/कंपनी/अशा सर्व आस्थापनांना लागू आहे.
2) ज्या आस्थापनांमध्ये उक्त कामगारांचे अनुपस्थितीमुळे उक्त आस्थापनांचा धोका निर्माण होऊ शकतो अथवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कर्मचा-यांसाठी लागू नाही.
3) सदर आदेशाचे पालन न करणा-या आस्थापना प्रमुख हे कारवाईस पात्र राहतील.
4) सदरहू आदेश हा अन्य जिल्ह्यात काम करणा-या परंतु जिल्ह्याच्या क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या आस्थापना प्रमुखांनाही लागू होत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!