पनवेल दि.२९: मत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७२ वा वाढदिवस आहे. त्या निमिताने सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ३० ते ३१ मे पर्यंत न्हावेखाडी क्रिकेट क्लबच्या वतीने न्हावे खाडी उत्तरपाडा येथील श्री महेश्वरी मैदानावर ‘लोकनेते रामशेठ ठाकूर चषक २०२३’ प्रकाश झोतातील भव्य टेनिस क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास ०२ लाख रुपये व भव्य चषक, तर उपविजेत्या संघास ०१ लाख रुपये व भव्य चषक, मालिकावीरास मोटारसायकल व चषक, तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास प्रत्येकी १० हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
ग्रामस्थ मंडळ न्हावेखाडी व श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीच्यावतीने गुरुवार दिनांक ०१ जून रोजी सायंकाळी ७. ३० वाजता श्री म्हसेश्वर मंदिर न्हावेखाडी रामबाग येथे सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर यांच्या सुमधूर आवाजातील मराठी हिंदी जुनी-नवीन गाणी, कोळीगीत, चित्रपटगीत, लावणी आणि गझलांची सायंकालीन मैफिल होणार आहे. ०२ जून रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद तर त्याचदिवशी सायंकाळी ७. ३० वाजता स्टेप आर्ट डान्स अकॅडमी प्रस्तुत पप्पू सूर्यराव निर्मित आणि गायक योगेश आग्रावकर, गायक अमोल जाधव, हास्य कलाकार सुशांत पाटील अशा अनेक कलाकारांचा समावेश असलेला ‘जल्लोष सुवर्णयुगाचा’ हा नृत्य आणि हास्य मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष व न्हावे ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, मंदिर कमिटीचे अध्यक्ष सी. एल. ठाकूर आणि न्हावे क्रिकेट क्लबने केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!