मुंबई दि.३०: राज्य शासनाच्याकडून राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ मुख अभियानासाठी सचिनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सचिन करणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री गिरीश महाजन अन् सचिन तेंडुलकर उपस्थित होते.
वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत काही शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या वर्षापासून महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान म्हणजेच स्वच्छ मुख अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.