पनवेल दि.१५: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ‘नमो चषक’ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत, त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात दिनांक १६ ते १८ जानेवारी पर्यंत पनवेलमध्ये ‘नमो चषक २०२४’ फ़ुटबाँल स्पर्धा’ होणार आहे.
पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे दोन गटात हि स्पर्धा होणार आहे. खुला गटातील विजेत्या संघास २० हजार रुपये, उपविजेत्या संघास १० हजार रुपये, तर १७ वर्षाखालील गटातील विजेत्या संघाला १० हजार रुपये आणि उपविजेत्या संघास ०५ हजार रुपये आणि सर्व विजेत्या संघाला सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी अभिषेक भोपी – ९८२०७०२०४३ किंवा यश भोईर -९३७२७०१९३० यांच्याशी संपर्क साधावा.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!