पनवेल दि.१७: देशातील अनेक राज्यांना एकमेकांशी जोडणारे पनवेल रेल्वे स्थानक स्वच्छतेत अव्वल ठरले आहे. मध्य रेल्वेच्या स्वच्छ रेल्वे स्थानक स्पर्धेत अ दर्जां असलेल्या रेल्वे स्थानकाच्या यादीत पनवेलला २०२३ चा प्रथम क्रमांक पटकावला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने नुकताच स्टेशन मास्तर जगदिश मिना यांचा सत्कार करून फिरते चषक पनवेल रेल्वे प्रशासनाकडे सुपुर्त केले. ही माहिती समजताच रेल्वे स्थानक सल्लागार समितीच सदस्य सुनिल खळदे यांनी स्टेशन मास्तर जगदिश मिना यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.
ठाणे, विरार, अंधेरी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदी लोकल स्थानकांसह देशाशी जोडणाऱ्या शेकडो पँसेंजर. जेएनपीटीला देशाशी जोडणाऱ्या मालवाहू रेल्वेमुळे देशभर ख्याती असलेल्या पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांची वर्दळ नेहमीच सूरू असते. डेडिकेटेड फ्रंन्ट कॉरिडोरचे काम, पनवेल कर्जत मार्गांचे काम आदींमुळे अनेक बदल होत असलेल्या पनवेल रेल्वे स्थानकातील स्वच्छता राखून ठेवण्यास प्रशासनाने बाजी मारली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून अ प्लस आणि अ असा दर्जां असलेल्या रेल्वे स्थानकातील स्वच्छ रेल्वे स्थानक स्पर्धां घेतली जाते. २०१७ पुर्वी पनवेल रेल्वे स्थानकाला स्वच्छ रेल्वे स्थानकाचा किताब मिळाला होता. मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येणारी ट्रॉफी पुन्हा पनवेल रेल्वे स्थानकात आणण्याची किमया पनवेल रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर जगदिश मीना यांनी केली आहे. रेल्वे स्थानक परिसर, स्वच्छतागृह, स्थानकाबाहेरील परिसरात जास्तीत स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. २०२३ साली केलेल्या कामगिरीबद्दल प्रशासनाकडून मागील आठवड्यात विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. A प्लस विभागात कल्याण रेल्वे स्थानकाने बाजी मारली तर अ विभागात पनवेल रेल्वे स्थानकाने बाजी मारली. जगदिश मिना यांचे या कामगिरीबद्दल विविध स्थरातून अभिनंदन होते आहे.

मकरसंक्रांतीच्या दिवशी शुभेच्छा
पनवेल रेल्वे स्थानक स्वच्छ स्थानक स्पर्धेत प्रथम आल्याची माहिती समोर आलेली नव्हती. पनवेल रेल्वे स्थानकाच्या समिती सदस्यपदी नुकतीच निवड झालेल्या सुनिल खळदे यांना ही बाब समजताच सर्वप्रथम जावून स्टेशन मास्तर जगदिश मिना यांचे अभिनंदन केले आहे. कोणत्याही पनवेलकरांनी आमचे अभिनंदन केले नाही, तुम्ही पहिले पनवेलकर आहात अशी प्रतिक्रीया मिना यांनी दिली. त्यावर म्हणून मी मकरसंक्रातीच्या दिवशी आल्याचे उत्तर खळदे यांनी दिले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलची ओळख असलेले रेल्वे स्थानक अधिक स्वच्छ आणि प्रवाशांना सोईसुविधेत पुढे न्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!