ठाणे दि. २५ : गेली ९ वर्षे सीकेपी समाजात लोकप्रिय ठरलेला कार्ला येथील एकविरा गडावरील एक दिवस कायस्थांचा’ सोहळा शनिवार दि. २९ नोव्हेंबर रोजी होणार असून देशभरातील चांद्रसेनिय कायस्थ प्रभू मंडळी या सोहळ्यासाठी आवर्जुन उपस्थित राहणार आहेत. लोणावळा कार्ला येथील श्री एकविरा देवी सीकेपी समाजाची कुलदेवता म्हणून ओळखली जाते. पूर्वी म्हणजे १६व्या शतकापासून कार्ला गडावर सीकेपी समाजाचा राबता आहे. २०१७ पासून कार्ला येथील एकविरा देवीचा उत्सव साजरा करणे सुरु झाले. गेल्या नऊ वर्षांची परंपरा यावर्षीही सुरु राहणार असून ‘एक दिवस कायस्थांचा’ उत्सव शनिवार दि. २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता सीकेपी ज्ञातीतर्फे एकविरा आईचा अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर ६ वा. एकविरा गडाकडे पालखी रवाना होणार आहे. नंतरचे सर्व कार्यक्रम गडाच्या पायथ्याशी असलेल्या एकविरा ड्रिम व्हिला येथे होणार आहे. अभिषेक, एकविरा आई यज्ञ, गोंधळ व महाआरती, त्यानंतर खास सीकेपी पध्दतीचा शाकाहारी व मांसाहारी महाप्रसाद होणार आहे. सदरचा महाप्रसाद उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्या सहकार्याने होणार आहे. कार्यक्रमाचा प्रारंभ होमहवनाने होणार असून गोंधळ, महाआरती, मान्यवरांचे सत्कार, महाप्रसाद इत्यांदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी यंदा प्रथमच कायस्थांची एकविरा विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. गेली नऊ वर्षे या कार्यव्रâमाची लोकप्रियता वाढत आहे. देश विदेशातील सीकेपी मंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जुन उपस्थित राहत आहेत. एकविरा मंदिर परिसरात सीकेपी समाजाची वास्तु असावी अशी ज्ञाती बांधवांची मागणी असून त्यादृष्टीने यावर्षी सुरुवात होणार आहे. उत्सवासाठी पुणे, महाड, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, भिवंडी, ठाणे, बोरीवली इ. ठिकाणाहून विशेष बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उत्सवाचे प्रमुख आयोजक तुषार राजे तसेच रघुवीर देशमुख, विकास देशमुख, जयदिप कोरडे, निलेश गुप्ते, स्वप्निल प्रधान, अशोक कुळकर्णी, सागरिका कर्णिक, अजंली प्रधान इत्यादींनी केले आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!