पनवेल दि.27: पनवेल वकील संघटना म्हणजेच पनवेल बार असोसिएशनच्या व्यवस्थापन समितीच्या “जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२८’’ या कालावधीसाठी शनिवारी दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणूकिच्या प्रचारात वकिली व्यवसायाबरोबरच राजकीय, सामाजिक क्षेत्राचा दांडगा अनुभव असणारे जेष्ठ सहकारी ॲड. मनोज भुजबळ यांच्या पॅनलने आघाडी घेतली असून या पॅनलचाच विजय होणार आणि ॲड. भुजबळ हे वकील संघटनेच्या अध्यक्षपदावर चौथ्यांदा बाजी मारणार असा विश्वास पनवेलच्या वकीलांमधून व्यक्त करण्यात येत आहे. मागील कालावधीत ॲड. मनोज भुजबळ यांनी आणि त्यांच्या सक्षम सहकाऱ्यांनी न्यायालयीन कामकाजात वकील, अशील, कर्मचारी आणि न्यायालयात उद्भवणारे प्रश्न तसेच समस्या सोडवण्यासाठी विशेष काम केले आहे. यात प्रामुख्याने नवीन इमारतीसाठी पाठपुरावा, नवोदित वकिलांसाठी मार्गदर्शक व्याख्यानमाला, न्यायालयात विविध सुविधा पुरवण्या संदर्भात पाठपुरावा केला असून गरजवंत नवोदित वकिलांना विशेष सहकार्य केले आहे. तरुण वकिलांना केवळ अध्यक्ष नको, तर मार्गदर्शक, संरक्षक आणि खऱ्या अर्थाने विचारवंत याची गरज आहे. ॲड. मनोज भुजबळ यांनी तरुण वकिलांना मजबूत उभं राहण्यासाठी आधार दिला, दिशादर्शन आणि न्याय्य मंच दिला आहे. त्यांचा पॅनल हा स्वार्थासाठी नाही, तर बारच्या एकात्मतेसाठी आणि तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी उभा आहे. अनुभवी नेतृत्व, स्वच्छ प्रतिमा, सर्वांना न्याय देणारी भूमिका आणि कामाचा पारदर्शक पायंडा हे या पॅनलचे खरे बलस्थान आहे. म्हणूनच पुन्हा एकदा पनवेल बारमध्ये सकारात्मक बदल, सुरक्षित व्यावसायिक वातावरण आणि तरुणांना खऱ्या अर्थाने बळ देणारे नेतृत्व हवं असेल, तर ॲड. मनोज भुजबळ आणि त्यांच्या सक्षम पॅनलला दिलेला सभासद वकिलांचे एक मत पनवेल बारच्या भविष्यातील सर्वात मजबूत गुंतवणूक ठरेल. अशी ग्वाही पॅनलच्या वतीने देण्यात आली.
पुढील काळात प्रलंबित समस्या सोडवण्यावर भर देणार असून वकिलांसाठी डिजिटल लायब्ररी सुरु करणे, कर्मचारी संख्या वाढवण्यासाठी पाठपुरावा करणे, नवीन इमारतीचे मजले वाढवणे, जुन्या इमारतीचे बांधकाम सुरूं करणे, इतर न्यायिक प्राधिकरण पनवेलला आणणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे, डिजिटल कामकाज सुरु करणे, वकीलासाठी ग्रुप इंशोरंस योजना लागू करणे, वैध्याकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, सुनावन्यांच्या दिवसात सुसूत्रता आणणे या महत्वाच्या प्रश्नांसोबात यांसारखी इतर कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरवा करणार असल्याचे पॅनलच्या जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले आहे. पनवेल मधील वकिलांच्या सक्षम नेतृत्वासाठी पॅनल मधील अध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड. मनोज कृष्णाजी भुजबळ यांच्यासह उपाध्यक्ष पदासाठी ॲड. संतोष जोमा म्हात्रे, सचिव पदासाठी ॲड. प्रल्हाद घनश्याम खोपकर, सहसचिव (महिला राखीव) पदासाठी ॲड. हेमा सिताराम भगत, खजिनदार पदासाठी ॲड. धनराज कान्हा तोकडे, सहखजिनदार पदासाठी ॲड. विशाल लक्ष्मण डोंगरे, ऑडिटर पदासाठी ॲड. भूषण मोरेश्वर म्हात्रे, कार्यकारिणी सदस्य पदासाठी ॲड. विजयेंद्र नारायण मुंढे, ॲड. इर्शाद रमझान शेख तथा कार्यकारिणी सदस्य (महिला राखीव) पदासाठी ॲड. ज्योती पी. राऊत – उरणकर, ॲड. छाया रामदास म्हात्रे या सहकाऱ्यांना मतदान करून ॲड. मनोज भुजबळ यांच्याच पॅनलला विजयी करा असे आवाहन पॅनलच्या वतीने सर्व पनवेलच्या वकीलांप्रती करण्यात आले आहे.
![]()
