ठाणे दि.१७: पुढल्यावर्षी गणपती बाप्पा 11 दिवस लवकर येणार आहे. पुढच्यावर्षी श्रीगणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट 2025 रोजी येणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यानी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की यावर्षी गौरी-गणपतीचे विसर्जन सहाव्या दिवशी होत आहे. पुढच्यावर्षी गौरी-गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी होणार आहे. पुढच्यावर्षी मंगळवार 2 सप्टेंबर 2025 रोजी गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. तसेच पुढच्यावर्षी अनंत चतुर्दशी 11 व्या दिवशी शनिवार 6 सप्टेंबर 2025 रोजी येणार आहे.
पुढील 11 वर्षातील श्रीगणेश चतुर्थीचे दिवस
1) बुधवार 27 ऑगस्ट 2025
2) सोमवार 14 सप्टेंबर 2026
3) शनिवार 4 सप्टेंबर 2027
4) बुधवार 23 ऑगस्ट 2028
5) मंगळवार 11 सप्टेंबर 2029
6) रविवार 1 सप्टेंबर 2030
7) शनिवार 20 सप्टेंबर 2031
8) बुधवार 8 सप्टेंबर 2032
9) रविवार 28 ऑगस्ट 2033
10) शनिवार 16 सप्टेंबर 2034
11) बुधवार 5 सप्टेंबर 2035